Join us

ऋषी आणि तनूचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 14:39 IST

कसम ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या मालिकेतील ऋषी आणि तनूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. ऋषी ...

कसम ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या मालिकेतील ऋषी आणि तनूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. ऋषी आणि तनूचा विवाह कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. ऋषी आणि तनू यांचा विवाह लवकरच होणार असून तो फुली फिल्मी स्टाइलमध्ये होणार आहे. पवनचे सलोनीसोबत आधीच लग्न झाले आहे हे कळल्यावर तनू लग्न मोडणार आहे आणि त्यानंतर तनूसोबत लग्न करण्याचा ऋषी निर्णय घेणार आहे.