Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मालिकेच्या सेटवर जुळतात लग्न, आणखी एक टीव्ही कपल प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:04 IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या सेटवर सध्या प्रेमाची जादू पाहायला मिळत आहे. लव्ह इज इन द एअर ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या सेटवर सध्या प्रेमाची जादू पाहायला मिळत आहे. लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती सेटवर निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या रंगल्या आहेत. नायरा आणि कार्तिक यांची रिल लव्ह स्टोरी आता रियल लाइफमध्येही सुरु झाल्याचं बोललं जात आहे. नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान यांच्यात सध्या रियल लाइफ लव्ह स्टोरी रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चांगल्याच रंगल्या असताना याच मालिकेतील आणखी एक जोडीची प्रेमाच्या नात्यात बुडाल्याचं बोललं जात आहे. ये रिश्ता क्या कहेलाता है या मालिकेत नक्ष ही भूमिका साकारणारा अभिनेता रिषी देव आणि मोहेना सिंग यांच्यात प्रेमाचं नातं जडू लागलं आहे. दोघंही एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवत आहेत. दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे. निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे. रिषी आणि मोहेना यांच्यातील या प्रेमाच्या नात्याची आणि दोघंही एकत्र बराच काळ घालवत असल्याची कल्पना मालिकेच्या सेटवरही प्रत्येकाला कल्पना आलीच आहे. एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याची कबूली दोघांनीही दिली आहे. असं असलं तरी आपण फक्त आणि फक्त चांगले मित्र असल्याचे हे दोघं सांगत आहे. मोहेना ही खूप स्पेशल आणि खास आहे. एक उत्तम सहकलाकार म्हणून तिच्यासोबत काम करायला मज्जा येते आणि आपण फक्त चांगले मित्र आहोत असं रिषीने सांगितले आहे. मोहेनानंसुद्धा रिषीच्या सूरात सूर मिसळला असून मैत्रीचा राग आळवलाय. आपण दोघं एकमेकांच्या खूप जवळ आलो आहोत मात्र ते प्रेमाच्या नात्याने नसून तर मैत्रीच्या नात्याने असे मोहेनानं स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या दोघांत प्रेमाची खिचडी शिजतेय की नाही हे सांगणं थोडं कठीणच आहे. विशेष म्हणजे या मालिकेत आधी नक्ष ही भूमिका साकारणारा अभिनेता रोहन मेहरा याचं याच मालिकेत त्याच्या बहिणीची भूमिका साकारणा-या कांची सिंग (गयू) हिच्याशी सेटवर प्रेमाचे संबंध जडले होते. याशिवाय याच मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारणा-या हिना खान हिचे मालिकेतील पालक संजीव सेठ आणि लता सबरवाल हे दोघंही ये रिश्ता क्या कहेलाता है या मालिकेच्या सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्नबंधनात अडकले. सध्या ये रिश्या क्या कहेलाता है या मालिकेत नक्ष आणि किर्ती यांचा विवाहसोहळा रंगणार आहे. दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे किर्ती आणि नक्षच्या लग्नाची धमाकेदार पार्टी, बॅचलर पार्टीसह अनेक गोष्टी छोट्या पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहेत.Also Read:अक्षय कुमारने ये रिश्ता क्या कहलाता है च्या टीमला करायला लावली रिहर्सल