झी मराठीवरील 'तारिणी' मालिकेत झळकणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने २०२५ या सरत्या वर्षातल्या तिच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले. शिवानीसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरल. शिवानी म्हणाली, ''२०२५ माझ्यासाठी खूप खास आहे. जानेवारी २०२५ मध्ये माझे लग्न झाल आणि माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत माझ्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली. लग्नानंतर जीवनात बरेच बदल होतात आणि माझ्या बाबतीत हे सर्व बदल सकारात्मक होते.''
शिवानी सोनार म्हणाली की, ''कुटुंबापासून दूर राहण्याची सवय नव्हती तर ती गोष्ट नवीन आहे माझ्यासाठी आणि मी नक्कीच माझ्या कुटुंबाला खूप मिस करते. माझा धाकटा भाऊही यावर्षी कामासाठी बंगलोरला गेला. पहिल्यांदाच तो माझ्यापासून दूर आहे, पण तो त्याच करिअर बनवतोय, आयुष्यात पुढे जात आहे हे बघून मला आनंदही आहे.''
''२०२५ तू माझं आयुष्य सकारात्मक केलंस...''
व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, ''या वर्षी मला 'तारिणी' ही नवीन मालिका मिळाली. मी साकारत असलेल पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. झी मराठी आणि निर्मिती संस्थेसोबत हे माझं पहिलच असोसिएशन आहे. संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा मला खूप आनंद मिळतोय. २०२५ मधील अविस्मरणीय क्षणांपैकी एक सांगायचं तर माझा लग्न आणि माझी 'तारिणी' मालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भलीमोठी लागलेली होर्डिंग्स. मी अतिशय आनंदी होती ते पाहून. या वर्षी आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता न आल्याची खंत मला आहे. त्यामुळे पुढील वर्षात व्यायाम, झोप आणि एकूणच दिनचर्या सुधारण्याचे ठरवले आहे. हे सध्या 'वर्क इन प्रोग्रेस' आहे. २०२५ तू माझं आयुष्य सकारात्मक केलंस. नववर्ष साजरे करण्याबाबत शिवानी म्हणाली, दरवर्षी मी कुटुंब-मित्रपरीवार सोबत नववर्ष साजरे करते. पण यंदा कदाचित मी 'तारिणी'च्या शूटवर असेन. तरीही शूट सांभाळून माझ्या प्रियजनांसोबतच मी नवीन वर्षाचे स्वागत करेन.''
Web Summary : Actress Shivani Sonar recalls 2025: a year of marriage and 'Tarini' success. Balancing family and career, she cherishes new beginnings and professional milestones. She aims to improve her health in the coming year.
Web Summary : अभिनेत्री शिवानी सोनार को 2025 याद है: शादी और 'तारिणी' की सफलता का वर्ष। परिवार और करियर को संतुलित करते हुए, वह नई शुरुआत और पेशेवर मील के पत्थर को संजोती हैं। आने वाले वर्ष में उनका लक्ष्य अपने स्वास्थ्य को बेहतर बनाना है।