Join us

इच्छाप्यारी नागिन या मालिकेने मारली सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 14:31 IST

इच्छाप्यारी नागिन ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. ...

इच्छाप्यारी नागिन ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेची पटकथा ही प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेने नुकतेच 100 भागांचा टप्पा पार केला. इच्छाप्यारी नागिन या मालिकेने 100 भाग पूर्ण केल्याबद्दल आणि या मालिकेचा टिआरपी दिवसेंदिवस वाढत असल्याने या मालिकेच्या टीमने नुकतेच सेलिब्रेशन केले. या मालिकेत प्रियल गोर इच्छाधारी नागिनची भूमिका साकारत असून तिच्या अभिनयातून तिने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. या मालिकेच्या सेटवर सगळेजण प्रियलचे खूप लाड करतात, तसेच तिची खूप काळजी घेतात असे ती सांगते. तिच्या वाढदिवसाला तर त्यांनी तिला खूप चांगले सरप्राइजदेखील दिले होते. तर या मालिकेत बब्बलची भूमिका साकारणारा मिश्कात वर्मा या मालिकेचा टिआरपी वाढत असल्याने खूपच खूश आहे. पहिल्याच आठवड्यापासून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले असल्याचा खूप आनंद होत असल्याचेही तो सांगतो. या मालिकेत प्रियल आणि मिश्कातसोबतच रेहिना मल्होत्रा, साधिल कपूर, सोनिया सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत फरीदा दादी प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. फरीदा दादी यांनी थ्री इडियट, रहस्य यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या मालिकेद्वारे त्या कित्येक महिन्यांनंतर छोट्या पडद्यावर झळकल्या आहेत. फरीदा दादी यांना बेबी फरिदा म्हणूनदेखील ओळखले जाते. त्यांनी साठच्या दशकात अनेक चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या.इच्छाप्यारी नागिन या मालिकेने सेंच्युरी मारल्यानंतर आता या मालिकेची टीम डबल सेंच्युरी मारण्यासाठी जोमाने तयारी करत आहे.