सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'मेरे साई- श्रद्धा और सबुरी' मालिकेत तुषार दळवी हा प्रसिद्ध कलाकार साईंची मध्यवर्ती भूमिका करत आहे आणि आता मालिकेतील पुढील कथानकासाठी मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेला घेण्यात आले आहे. भार्गवीने अनेक मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे. आता ती मेरे साई मालिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या आगामी कथानकात भार्गवी चिरमुले एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती चंद्रा बोरकर नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी साईंची बहीण आहे आणि दोन मुलं असलेले तिचे सुखी कुटुंब आहे. परंतु, एके दिवशी तिचा नवरा ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या कुटुंबाला सोडून निघून जातो, कारण कुटुंबाप्रती असलेल्या आपल्या जबाबदार्या म्हणजे त्याला आपल्या मार्गातला अडथळा वाटतो. स्वाभाविकपणे चंद्रावर आकाशच कोसळते. साई आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि चंद्राच्या पतीला ही जाणीव करून देतात की, आपल्या जबाबदार्या पूर्ण केल्यावरच ज्ञानप्राप्ती होते.
मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिसणार 'मेरे साई' मालिकेमध्ये, साकारतेय ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 17:36 IST