Join us

जयदीपने कड्यावरुन का ढकललं असेल? माईंच्या साथीने गौरी घेणार त्या घटनेमागील कारणाचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:49 IST

Sukh mhanje nakki kay asta: स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गौरी आणि माई एकमेकींशी चर्चा करत आहेत.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh mhanje nakki kay asta). ही मालिका सुरु होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, दरवेळी मालिक येणाऱ्या चढउतारांमुळे ही मालिका रंजक होत आहे. जयदीप आणि गौरी यांच्यात हळूहळू प्रेम फुलत असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा आला. इतकंच नाही तर जयदीपने गौरीला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे आता गौरी आणि माई एकमेकांच्या साथीने या घटनेमागील शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गौरी आणि माई एकमेकींशी चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे रुप बदलून आलेली नवी पाहुणी गौरीच असल्याचं केवळ माईंना माहित आहे. त्यामुळे आता जयदीप मानसीच्या आहारी कसा काय गेला याचा शोध त्या दोघी घेणार आहेत.

दरम्यान,  गौरी आणि जयदीप यांना मूल होणार नसल्याचं लक्षात येताच ते सरोगसीद्वारे बाळाला जन्म द्यायचं ठरवतात. यासाठी मानसीने पुढाकार दाखवला. परंतु, मानसी हे सारं शालिनीच्या सांगण्यावरुन करत असल्याचं गौरीला समजतं. त्यामुळे ती जयदीपला सांगायचा प्रयत्न करते. परंतु, तो मानसीसमोर गौरीला उंच कड्यावरुन खाली ढकलतो. त्यानंतर आता गौरी नवं रुप घेऊन या मालिकेत आली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारवर्षा उसगांवकर