Join us  

इनामदारांचा बंगला सोडून सौंदर्या कायमची राहणार दिपाकडे; मालिकेत आलं नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 2:53 PM

Rang majha wegla: सौंदर्या तिचं घर सोडून दिपाकडे राहायला आली आहे. विशेष म्हणजे सौंदर्या अचानकपणे आल्यामुळे दिपा पार गोंधळून गेली आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र राहणाऱ्या दिपा आणि कार्तिक यांची पुन्हा भेट झाली आहे. त्यामुळे या मालिकेला रंजक वळण आलं आहे. त्यातच दिपा आणि कार्तिकने पुन्हा एकत्र यावं अशी सौंदर्याची इच्छा आहे. त्यामुळे ती या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहे.

यामध्येच आता सौंदर्या इनामदारांचा बंगला सोडून चक्क दिपाकडे राहायला आली आहे.स्टार प्रवाहने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सौंदर्या तिचं घर सोडून दिपाकडे राहायला आली आहे. विशेष म्हणजे सौंदर्या अचानकपणे आल्यामुळे दिपा पार गोंधळून गेली आहे. इतकंच नाही तर या घरात तुम्हाला राहणं शक्य नाही असंही ती सांगायचा प्रयत्न करते. मात्र, सौंदर्या तिचं एक ऐकत नाही.

दरम्यान, कार्तिकी आणि दिपिका यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्यामुळे पर्यायाने कार्तिक आणि दिपाचीही वरचेवर भेट होऊ लागली आहे. त्यामुळेच वारंवार कार्तिकची भेट होऊ नये यासाठी दिपा कार्तिकीला घेऊन गावी राहायला जाते. परंतु, दिपाने पुन्हा शहरात येऊन रहावं यासाठी कार्तिकसह सगळेच तिला आग्रह करतात. मात्र, दिपा तयार होत नाही. पर्यायाने सौंदर्याच आता तिच्याकडे रहायला आली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररेश्मा शिंदे