Mrunal Dusanis: छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मृणालने २०१६ मध्ये नीरज मोरेसोबत लग्नगाठ बांधली आणि ती परदेशात स्थायिक झाली.त्यानंतर जवळपास ४ वर्षानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती साकारत असलेल्या पात्राला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय.अशातच मृणाल सध्या तिने एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
नुकतीच मृणाल दुसानीस आणि तिचा पती नीरजने 'अनुरुप विवाहसंस्था'या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मृणालने त्यांच्या त्यांच्या लव्हस्टोरीचा किस्सा शेअर केला आहे. मृणाल-नीरज यांचं अरेंज मॅरेज झालं आहे. या जोडप्याला गोड मुलगी देखील आहे. मात्र, त्यांची प्रेमकहाणी अगदी फिल्मी आहे. त्याविषयी मुलाखतीमध्ये बोलताना अभिनेत्री म्हणाली," मी घरात बाबा किंवा भावाचे कपडे घालायचे. मला ती सवय आहे. तर एकदा मी बाबांचं शर्ट घातलं होतं. त्यावेळी मी नीरजला चिठ्ठी लिहिली, त्याचा फोटो काढला आणि ती चिठ्ठी त्या शर्टच्या खिशात ठेवली. त्यानंतर मग कुठेतरी जायचं म्हणून बाबांनी तो शर्ट घातला. तेव्हा ती चिठ्ठी बाबांनी वाचली आणि मग त्यांना कळलं की आम्ही आता प्रेमात पडलो आहोत.त्याचदिवशी मी आई-बाबांना नीरजबरोबर लग्न करायला तयार असल्याचं सांगितलं होतं." असा फिल्मी किस्सा अभिनेत्रीने शेअर केला.
वर्कफ्रंट
मृणाल दुसानीसच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'तू तिथे मी','माझिया प्रियाला प्रीत कळेना','हे मन बावरे' यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारुन तिने छोटा पडदा गाजवला आहे. सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.