Join us

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीची तेजश्री प्रधानच्या मालिकेत वर्णी! साकारणार लक्षवेधी भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:08 IST

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसणार ही अभिनेत्री, कोणती भूमिका साकारणार

Television: छोट्या पडद्यावर नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या मराठी मालिकाविश्वात वीण दोघांतली ही तुटेना मालिकेची जोरदार चर्चा आहे. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान, या मालिकेत 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे शर्मिला शिंदे आहे.

दरम्यान, या मालिकेत तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेत आहे तर सुबोध भावे समरची भूमिका साकारणार आहे. तर शर्मिला शिंदे समरची मैत्रीण म्हणजेच निकिताच्या भूमिकेत दिसणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेनंतर एका छोट्या विश्रांतीनंतर शर्मिला नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. जवळपास १ वर्ष अधिराज्य गाजवल्यावर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा शर्मिलाला छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे.

येत्या ११ ऑगस्टपासून ही मालिका दररोज संध्याकाळी ७,३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्यासह अभिनेता राज मोरे, पूर्णिमा डे तसेच किशोरी अंबिये, शर्मिला शिंदे अशा कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.

वर्कफ्रंट

शर्मिला शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने  'पुढचं पाऊल', 'माझ्या नवऱ्याची बायको' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.अनेक मालिकांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. 

टॅग्स :शर्मिला राजारामतेजश्री प्रधान टेलिव्हिजनसेलिब्रिटी