Join us
Daily Top 2Weekly Top 5

आली लगीनसराई, मांडव सजला दारी! मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रीचं पार पडलं केळवण, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:17 IST

आली लग्नघटिका समीप! थाटात पार पडलं लोकप्रिय अभिनेत्रीचं केळवण,'या' मालिकेत करतेय काम 

Sakshi Mahajan Kelvan: सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ एक असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव सामील होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे साक्षी महाजन आहे. गेल्या काही दिवसांपासून साक्षी महाजन लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु होत्या. अशातच नुकतंच या अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. याचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.

अभिनेत्री साक्षी महाजन सध्या 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत विद्या नावाची भूमिका साकारते आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, साक्षी महाजनने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर पहिल्या केळवणाचा फोटो शेअर केला आहे.त्यामुळे आता केळवण पार पडल्यावर ती लग्नबंधनात केव्हा अडकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. फुलांची सजावट आणि  पंचपक्वानांनी भरलेलं ताट असा सुंदर फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

अलिकडेच साक्षीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. त्यासोबत तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सुद्धा रिव्हिल केला होता. आता लवकरच ती बोहल्यावर चढणार आहे. साक्षी येत्या काही दिवसांत अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress Sakshi Mahajan's Kelvan ceremony: Pre-wedding celebrations begin!

Web Summary : Actress Sakshi Mahajan, currently seen in 'Kon Hotis Tu Kay Jalis Tu,' is preparing for her wedding. Her Kelvan ceremony recently took place, with photos shared online. Sakshi will soon marry actor Atharva Karve. Wedding bells are ringing!
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया