Reshma Shinde Video: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. अगदी अल्पावधीतच ही मालिका जणू प्रेक्षकांच्या गळ्यातील बनली. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे तसेच सविता प्रभूणे यांसारखे तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान, या मालिकेतील जानकी-ऋषीकेशची जोडी तसेच त्यांची लेक ओवी, ऐश्वर्या, नानासाहेब आणि शरु ही पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहेत. अशातच या मालिकेत ऑनस्क्रिन मायलेकी असणाऱ्या रेश्मा शिंदे आणि आरोही सांब्रे यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत रेश्मा शिंदेने 'जानकी रणदिवे' तर, आरोही सांब्रेने ओवी ही भूमिका साकारली आहे. या दोघी ऑनस्क्रीन एकमेकींच्या मायलेकी आहेत. शिवाय ऑफस्क्रीन त्यांचा बॉण्ड देखील खूप चांगला आहे. नुकताच सोशल मीडियावर ऑनस्क्रिन मायलेकी नुकत्याच एका व्हायरल गाण्यावर थिरकल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेडिंगवर आहेत. त्यातील एक म्हणजे 'एक नंबर, तुझी कंबर' या ट्रेंडिग गाण्यावर या दोघींनी जबरदस्त असा डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे.
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओमध्ये जानकी आणि ओवीने अफलातून डान्स केला आहे. या व्हिडीओमधील त्यांची एनर्जी आणि चेहऱ्यावरील हावभाव नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. रेश्माने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये "जानकी आई- ओवी.., तुम्हाला तुमच्या आई सोबत किंवा मुलीसोबत अस गाण्यावर थिरकायला आवडेल का? असं कॅप्शन लिहिलं आहे. रेश्मा आणि ओवीची जबरदस्त एनर्जी यामध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडीओवर "कडक...","बेस्ट ऑनस्क्रिन आई आणि मुलगी...", अशा कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.