Join us

"डिप्रेशनमध्ये गेले, काम करणं सोडलं...", मॉडेलिंग क्षेत्रात काम करताना मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:51 IST

"घरीच बसले होते, काम करणं सोडलं...", 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट अनुभव, व्यक्त केलं दु:ख 

Disha Pardeshi: 'स्वाभिमान', 'लाखात एक आमचा दादा' अशा अनेक मराठी मालिकांमधून प्रेभकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे दिशा परदेशी (Disha Pardeshi) . अलिकडेच अभिनेत्रीने लाखात एक दादा मालिकेतून एक्झिट घेतल्याने प्रचंड चर्चेत आली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. मात्र, आता दिशाने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

नुकतीच अभिनेत्री दिशा परदेशीने 'मराठी मनोरंजन विश्व' या युट्यूब चॅनेनला मुलाखतदिली. त्यादरम्यान, मॉडेलिंग  क्षेत्रात काम करताना आलेल्या वाईट अनुभवांवर भाष्य केलं आहे. यावर बोलताना दिशा म्हणाली, "मी एक कथ्थक करणारी मुलगी होते. जेव्हा मी मॉडेलिंग क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला आणि माझ्या आई-वडिलांना फारसे चांगले अनुभव आले नाहीत. त्यावेळी मॉडेलिंग काय आहे याबद्दल लोकांना काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेला इन्स्टाग्राम नव्हता, शिवाय गुगलवरही फार कमी माहिती होती. या क्षेत्राबद्दल लोक अभ्यासू नव्हते. त्यांचा या क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता. पण, आता माझ्या बिल्डिंगमध्ये शंभरहून अधिक फोटोग्राफर असतील, दहा-पंधरा मॉडेल असतील. म्हणजे त्यावेळी मॉडेलिंग करते म्हणजे नक्की काय करते याबद्दल लोकांना कळायचं नाही. "

माझ्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या...

त्यानंतर दिशाने सांगितलं, "आपल्याकडे मॅगझिन्सचं वेड नाही आहे. पण, तेव्हा मी मॅगझीन शूट करायचे. त्यामुळे लोकांना माहितच नसायचं मी काय काम करते. तेव्हा माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या. कारण, मी जर अभिनय केला असता किंवा एखादी मालिका करत असते तर टीव्हीवर लोकांना दिसले असते. किंवा  नाटक केलं असतं तर बातमी आली असती. मॉडलिंगबद्दल सर्वसामान्य घरात कोणाला काहीच माहित नसतं. एखाद्या जाहिरातीत तू दिसली तर लोकांना समजतं. पण, बाकीच्या इतर वेळी ही कुठल्या शूटला जाते? एवढ्या रात्रीची ही बाहेर काय करते, कुठे जाते आज नाईट शिफ्ट आहे वाटतं? अशा अफवा पसरवल्या गेल्या. त्याबद्दल सांगून मी आणि माझे आई-बाबा पण थकले."

"मी खूप काही ऐकलं आहे. त्या नकारात्मक गोष्टीतून मी खूप काही शिकले. मला चांगलं आठवतंय मी एक- दीड वर्ष घरीच बसले होते, काम सोडलं होतं. एवढी मी डिप्रेशनमध्ये गेले. मी घाबरलेले. तेव्हा आई-बाबांनी समजावलं. तेव्हा आईने तिच्या ऑफिसचे प्रसंग सांगत  समजूत काढली. त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. " असा खुलासा अभिनेत्रीने केला.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी