Aai Tuljabhavani Serial: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग कमालीचा वाढला आहे. काही जु्न्या मालिका बंद होऊन त्याजागी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर काही मालिकांमध्ये नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. अशातच मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे. ही अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर. 'बिग बॉस' गाजवणाऱ्या जान्हवी किल्लेकरची (Jahnavi Killekar) कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत वर्णी लागली आहे.
नुकताच सोशल मीडियावर भूमिका असलेल्या 'आई तुळजाभवानी' या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मोहिनी असं तिच्या पात्राचं नाव असणार आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर आई तुळजाभवानी मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधली जान्हवी किल्लेकरच्या नव्या लूकची सगळीकडे चर्चा सुरु आहे. "मोहाचा मोह, मोहिनीचा पाश भुलवून करते कायमचा नाश, अशी मोहिनी येतेय आपल्या भेटीला!" असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
दरम्यान,जान्हवीला आई तुळजाभवानी मालिकेत पाहण्यासाठी आता प्रेक्षक देखील उत्सुक झाले आहे. अलिकडेच ती स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत डॅशिंग महिला पोलीस अधिकारी म्हणून पाहायला मिळाली. त्यानंतर आता या पौराणिक मालिकेत जान्हवी नव्या रुपात पाहायला मिळणार आहे.