Join us

ठरलं तर मग! 'लग्नानंतर होईल प्रेम' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात! मैत्रीणींसह केली Bride to Be पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:26 IST

'लग्नानंतर होईल प्रेम'फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, Bride to Be पार्टीचे फोटो व्हायरल 

Anushka Pimputkar And Meghan Jadhav: मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत इंडस्ट्रीतील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. प्राजक्ता गायकवाड, शिवानी नाईक अभिनेता निषाद भोईर, एतिशा सांझगिरी अशा या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका कपलचं नाव जोडलं जाणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का पिंपुटकर आहे. नुकताच अभिनेत्रीने तिच्या बाईड टू बी पार्टीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दरम्यान, अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतंय की, ती तिच्या मित्र-मैत्रिणीसमवेत बसली असून एक केक कापताना दिसत आहे. अनुष्कासाठी मित्र परिवाराने सुंदर असं फुग्यांचं डेकोरेशन केलं आहे. तसेच त्यांची मैत्रीची एक गोड आठवण म्हणून अभिनेत्रीला सगळे फोटो एकत्र करून साधी पण तितकीच सुंदर अशी फ्रेम बनवून दिली आहे. अनुष्काने हे सुंदर फोटो शेअर करत एक लक्षवेधी कॅप्शनही लिहिलं आहे. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

होणारा नवराही आहे अभिनेता...!

अलिकडेच अनुष्का पिंपुटकरने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. शिवाय अभिनेत्रीचं केळवणही थाटात पार पडलं. 'लक्ष्मी निवास' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता मेघन जाधवसोबत ती येत्या काही दिवसांत लग्नगाठ बांधणार आहे. मेघन आणि अनुष्का गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनी नातं जगजाहीर केलं आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासूनच दोघं एकमेकांच्या प्रेमात होते. मिळालेल्या माहितीनुसार येत्या १६ नोव्हेंबरला हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Tharala Tar Mag!' Actress Anushka Pimputkar to wed Meghan Jadhav soon.

Web Summary : Anushka Pimputkar, famed for 'Laganaanter Hovil Prem,' is set to marry Meghan Jadhav. The actress celebrated her 'Bride to Be' party with friends, sharing photos online. They will get married on November 16.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया