Aditi Dravid: मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, गीतकार आणि नृत्यांगना म्हणून अदिती द्रविडकडे पाहिलं जातं. विविध चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवलेली ही अभिनेत्री मागील काही वर्षे छोट्या पडद्यावर फारशी सक्रिय नव्हती. मात्र, आता अदिती नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. याबाबत खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना माहिती दिली आहे.
नुकतीच अदिती द्रविडनेसोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. मोठ्या ब्रेकनंतर अदितीने स्टार प्रवाह वाहिनीवर कमबॅक केलं आहे. अदितीने वेगवेगळ्या मालिकांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. हटके विषय असल्याने या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आजही या मालिकेच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेनंतर आता अदिती नव्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. लोकप्रिय अबोली मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शितल सरपोतदार असं तिच्या पात्राचं नाव आहे. अदितीच्या या कमबॅकबद्दल माहित मिळताच चाहते देखील प्रचंड खुश आहेत.
वर्कफ्रंट
आदिती द्रविडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'सुंदरा मनामध्ये भरली', 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. याशिवाय ती एक उत्तम गीतकार असून 'बाई पण भारी देवा' चित्रपटासाठी तिने लिहिलेलं मंगळागौरचं गाणं खूपच गाजलं.