Ritwik Talwalkar Engagement: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत अभिनेता अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांची मुख्य भूमिका आहे.या मालिकेतील अद्वैत-कलाच्या जोडीने मालिका रसिकांच्या मनात घर केलं आहे. याशिवाय आप्पासाहेब, रोहिणी आत्या तसेच सरोज, नैना, रोहन आणि सोहम ही पात्रांनी देखील प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. दरम्यान,काही दिवसांपूर्वीच अक्षर कोठारी लग्नबंधनात अडकला. त्यानंतर मालिकेतील आणखी एका अभिनेत्याने थाटामाटात साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत सोहमची भूमिका साकारणारा अभिनेता ऋत्विक तळवळकर सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ऋत्विकाने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. नुकताच अभिनेत्याचा साखरपुडा झाला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ऋत्विक तळवळकरने काही दिवसांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड अनुष्का चंदकला प्रपोज करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली.त्यानंतर आता अभिनेत्याने तिच्यासोबत नवा प्रवास सुरु करत साखपुडा केला आहे. आता लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे. यावेळी सेलिब्रिटींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ऋत्विक आणि अनुष्काचं ड्रीम प्रपोजल अनेकांच्या पसंतीस उतरलं होतं.
ऋत्विकने त्याच्या साखरपुड्यासाठी निळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे. तर त्याची होणारी पत्नी अनुष्काने सफेद रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. सध्या अभिनेत्याने साखरपुड्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
कोण आहे होणारी पत्नी?
ऋत्विक तळवलकरच्या गर्लफ्रेंडचं नाव अनुष्का चंदक असं आहे. अनुष्का एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे.सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडीओ उपलब्ध आहेत.