Join us

'अशोक मा. मा' मालिकेत आला नवा पाहुणा! 'या' लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री; प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:49 IST

'अशोक मा. मा' मालिकेत 'या' लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री; प्रोमो आला समोर

Indraneil Kamat :  छोट्या पडद्यावरील 'अशोक मा. मा' या मालिकेने प्रेक्षकांच्या मननात घर केलं आहे. या मालिकेत अभिनेते अशोख सराफ यांची मुख्य भूमिका आहे. दिवसेंदिवस या मालिकेत येणारे ट्विस्ट आणि कथानक रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, अशोक सराफ यांनी मालिकेत एका कडक शिस्तीच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्यात आता लोकप्रिय मालिकेत एक नवा पाहुणा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'पिरतीचा वणवा उरी पेटला' फेम अभिनेता इंद्रनील कामत एन्ट्री झाली आहे. याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

नुकताच सोशल मीडिया 'कलर्स मराठी' वाहिनीने 'अशोक मा.मा' मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे.  या प्रोमोमध्ये भैरवी ऑफिसमध्ये बॉस बनून आलेल्या इंद्रनीलची झलक पाहायला मिळते आहे. दरम्यान, इंद्रनील कामतने देखील त्याच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत मालिकेत त्याची एन्ट्री होणार असल्याचं कन्फर्म केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यामध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, "काही क्षण  स्वप्नांपेक्षा मोठे असतात. ज्यांना कायम पडद्यावर पाहत आलो त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ते म्हणजे अशोक सराफ सर...! त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करुन मी भारावून गेलो आहे. तितकाच आनंदी देखील आहे."

यानंतर इंद्रनीलने अभिनेत्री रसिका वाखारकरबद्दल लिहिलंय की, "आता पुन्हा एकदा मी रसिका वाखारकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आमची केमिस्ट्री पुन्हा पाहता येणार आहे. हा नवीन प्रवास म्हणजे माझ्यासाठी नवीन जग आहे...", अशा आशयाची पोस्ट लिहून अभिनेत्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. 'अशोक मा.मा.' ही मालिका मजेदार, खुमासदार आहे. या मालिकेत अशोक मामांसह 'कलर्स मराठी'च्या 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली रसिका वाखारकर, नेहा शितोळे, चैत्राली गुप्ते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेनंतर इंद्रनील कामत पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. अलिकडेच तो केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' चित्रपटात झळकला. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होती.

 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया