Join us

मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, मेहंदीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:26 IST

सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. हल्लीच अभिनेता निखिल राजेशिर्के आणि शाकालाका बूमबूम फेम अभिनेता किंशूक वैद्य यांचे लग्न पार पडले. आता आणखी एक मराठी कलाविश्वातील अभिनेता लग्नबेडीत अडकणार आहे.

सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. हल्लीच अभिनेता निखिल राजेशिर्के आणि शाकालाका बूमबूम फेम अभिनेता किंशूक वैद्य यांचे लग्न पार पडले. त्यानंतर आता 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे ही लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. आता आणखी एक मराठी कलाविश्वातील अभिनेता लग्नगाठ बांधतो आहे. हा अभिनेता म्हणजे सारं काही तिच्यासाठी मालिकेत श्रीनूची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक गावकर (Abhishek Gaonkar). २६  नोव्हेंबर म्हणजेच उद्या तो गर्लफ्रेंड सोनाली गुरवसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाली गुरव(Sonali Gurav)च्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. 

अभिनेता अभिषेक गावकर २६ नोव्हेंबरला गर्लफ्रेंड सोनाली गुरवसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. अभिषेक आणि सोनालीच्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. मेहेंदी सोहळ्यासाठी अभिषेकने कुर्ता परिधान केला होता. तर पिवळ्या रंगाचा स्कर्ट टॉप सोनालीने परिधान केला होता. त्यांच्या मेहंदीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तसेच सोनाली-अभिषेकच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अभिषेक गावकर मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेता आहे. त्याने सारं काही तिच्यासाठी मालिकेव्यतिरिक्त 'रात्रीस खेळ चाले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं,' 'माझी माणसं', 'हंडरेड डेज' यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तर सोनाली गुरव एक सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.