Join us
Daily Top 2Weekly Top 5

लतिका-अभिमन्यु पुन्हा येणार एकत्र; घरातल्यांचे गैरसमज होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 19:30 IST

Sundara manamadhe bharli: राग-रुसवा, अबोला, गैरसमज, मतभेद असं सारं काही घडून गेल्यानंतर आता हळूहळू अभिमन्यु आणि लतिका यांच्यात प्रेम खुलू लागलं आहे.

अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सुंदरा मनामध्ये भरली( sundara mann madhe bharli) या मालिकेत सध्या अनेक रंजक वळण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. राग-रुसवा, अबोला, गैरसमज, मतभेद असं सारं काही घडून गेल्यानंतर आता हळूहळू अभिमन्यु आणि लतिका यांच्यात प्रेम खुलू लागलं आहे. त्यामुळे आता लवकरच ही जोडी घटस्फोट न घेता एकत्र येणार आहेत.  विशेष म्हणजे लतिकाने मैत्रीचा हात पुढे केला असून अभ्यादेखील तिची साथ देत घरातल्यांचा गैरसमज दूर करणार आहे.

कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लतिका अभिमन्युसमोर मैत्रीचा हात पुढे करणार असून घरातल्यांचा झालेला गैरसमज दूर करण्याची जबाबदारी उचलणार आहे. इतकंच नाही तर अभ्यासुद्धा तिला साथ देताना दिसणार आहे. त्यामुळे या मालिकेत पुन्हा एक नवीन रंजकदार वळण येणार आहे.

दरम्यान, लतिकाचा तिरस्कार करणारा अभिमन्यु तिच्या गोड स्वभावामुळे हळूहळू तिच्या प्रेमात पडतो. मात्र, तो प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे या दोघांना विभक्त व्हावं लागतं. परंतु, आता त्यांच्या नात्यातील दुरावा लवकरच कमी होणार असून ही जोडी एकत्र येताना दिसणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीअक्षया नाईक