Join us

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत नवा ट्विस्ट, वर्षाचं सत्य आनंदी राघवसमोर आणू शकेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 07:00 IST

 कर्णिकांच्या घरी रोज सकाळी येणारी राघवची बहीण वर्षा काही दिवस घरी न आल्यामुळे आनंदी चिंतेत आहे.

‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतं आहे, आनंदी, राघव, रमा, चिंगी ही पात्र अगदी घरातल्यासारखी होऊन गेली आहेत. एखादा कौटुंबिक नाजूक विषय इतक्या छान पद्धतीने कसा हाताळला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका आहे.

 कर्णिकांच्या घरी रोज सकाळी येणारी राघवची बहीण वर्षा काही दिवस घरी न आल्यामुळे आनंदी चिंतेत आहे. वर्षाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय याची आनंदीला कुणकुण लागलेय. म्हणून आनंदी, रमाच्या मदतीने समजून घेण्यासाठी पहिल्यांदाच वर्षाच्या घरी जाते आणि तिथे वर्षाला न भेटता तिच्या नवऱ्यासोबत तिची भेट होते, या भेटीनंतर वर्षाच्या आयुष्यात नक्की काहीतरी गडबड आहे हे आनंदीला कळत. 

आनंदी ही गोष्ट घरात सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते पण कोणीच तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. एकीकडे आनंदीमुळे राघवच्या आयुष्यात नवे रंग भरले जात असताना वर्षाचं सत्य घरातल्यांसमोर येईल? सत्य समोर आल्यानंतर आनंदीची भावनिक साद आणि रमाची सुपर पावर वर्षाला तिच्या जाचातून मुक्त करतील?  हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे.  

टॅग्स :झी मराठी