Join us

२४ मध्ये मराठींची चलती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:26 IST

यंदाच्या २४च्या सिझनमध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. अभिनेते शरद पोंक्षे एका राजकारण्याची भूमिका साकारणार असून अभिनेत्री अमृता खानविलकर ...

यंदाच्या २४च्या सिझनमध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. अभिनेते शरद पोंक्षे एका राजकारण्याची भूमिका साकारणार असून अभिनेत्री अमृता खानविलकर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत. तसेच गिरीश ओक, प्रसन्न केतकर आणि नागेश भोसले हे मराठी कलाकारदेखील या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. गिरीश ओक कारागृहाच्या वॉर्डनच्या भूमिकेत आहेत तर प्रसन्न त्यांच्या सहकाऱ्याची भूमिका साकारत आहे. नागेश भोसले पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत.