Join us

"तुझी इतक्या वर्षांची मेहनत...", संकर्षण कऱ्हाडेसाठी तन्वी मुंडलेने शेअर केली पोस्ट, व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:14 IST

मोहन जोशींच्या हस्ते संकर्षण कऱ्हाडेला मिळाला 'हा' विशेष पुरस्कार; मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद, म्हणाली...

Tanvi Mundale Post: मराठी कलाविश्वातील अभिनेता, कवी आणि लेखक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. सिनेमा, नाटक, टीव्ही मालिका अशा सगळ्यांच माध्यमांतून त्याने छाप पाडली आहे. सध्या रंगभूमीवर त्याच्या कुटंब किर्रतन हे नाटक जोरदार सुरु आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडेसह अभिनेत्री वंदना गुप्ते, तन्वी  मुंडले देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळते आहे. अशातच सोशल मीडियावर तन्वी मुंडलेने (Tanvi Mundale)  नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चर्चेत आहे. 

नुकताच संकर्षण कऱ्हाडेला एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्याला ज्येष्ठ मराठी अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल अभिनेत्री तन्वी मुंडलेने त्यांचं कौतुक करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "उत्तम सहकलाकार मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि मी हे दर प्रयोगात अनुभवत आहे. काल तुला “ द. मा. मिरासदार” पुरस्कार मिळाला. तुझी इतक्या वर्षांची मेहनत आणि तुझं टॅलेंट हे सगळं खूप कमाल आहे. एक सहकलाकार म्हणून मला तुझा खूप अभिमान आणि आदर वाटतो. अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित होण्याची संधी तुला मिळो. खूप खूप अभिनंदन!!!".अशी सुंदर पोस्ट शेअर करत तन्वीने आनंद व्यक्त केला आहे. 

दरम्यान, तन्वीच्या पोस्टला प्रतिक्रिया देत अभिनेत्याने तिला छानसा रिप्लाय देखील केला आहे. "खूपच मस्तं , भारी वाटलं हे पाहून आणि वाचुन … तु केलेल्या कौतुकातली पहिली दोन वाक्यं मी चोरतो आणि तुझ्यासाठी म्हणतो … “उत्तम सहकलाकार मिळाण्यासाठी खरंच भाग्यं लागतं आणि हे दर प्रयोगात मी ही अनुभवतो आहे … तु केलेल्या कौतुकाचा , शुभेच्छांचा मनानासून स्विकार करतो … 🙏🏻वाचतांना छान वाटावं म्हणून Thank you म्हणतो … भेटूच … ! असं अभिनेत्याने म्हटलं आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारसोशल मीडिया