Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज एक गुलाब अन् चॉकलेट! होकारासाठी नवऱ्याला ८ महिने ठेवलेलं ताटकळत, अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे खास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:38 IST

वहिनीमुळे झाली भेट, होकारासाठी घेतले ८ महिने! 'सावळ्याची जणू सावली' मधील तिलोत्तमाची हटके लव्हस्टोरी 

Sulekha Talwalkar : अभिनेत्री  सुलेखा तळवलकर  या मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये केलं आहे.सध्या त्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'सावळ्याची जणू सावली'या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत.या मालिकेत सुलेखा तळवळकर या तिलोत्तमा ही भूमिका साकारत आहेत.अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

नुकतीच्या सुलेखा तळवलकर आणि त्यांचे पती अंबर या जोडप्याने 'The Anuroop Show' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणाचे किस्से शेअर केले. त्यावेळी मुलाखतीत सुलेखा यांचे पती अंबर तळवळकर म्हणाले, "खरंतर, आम्ही माझ्या वहिनीमुळे भेटलो तिचं नाव मेधा आहे. मेधा आणि सुलेखा एकाच चित्रपटात काम करत होत्या.महेश मांजरेकरांचा आई नावाचा तो चित्रपट होता. तेव्हा मी मेधा वहिनीसोबत सेटवर जायचो. तिथे पहिल्यांदा मला सुलेखा भेटली. तिला पाहताच क्षणी मी प्रेमात पडलो. त्यानंतर मेधा वहिनीसोबत आम्ही एक ट्रीप प्लॅन केली. तिथे सुलेखाला बोलवायचं असं ठरलं. दोन दिवसांनंतर आम्ही भेटलो आणि आमच्यात बोलणं झालं. आम्ही जो डिनर प्लॅन केला होता त्याच्यानंतर मी तिला प्रपोज केलं. पण, त्यानंतर होकार देण्यासाठी तिने जवळजवळ ६-८ महिने लावले."

मग पुढे ते म्हणाले,"तिच्या कॉलेजचं टाईमिंग ८ वाजताचं असायचं तेव्हा मी बरोबर पावणे आठ वाजता रुईया कॉलेजच्या बाहेर असायचो. ही घरून आली की टॅक्सी पकडून आम्ही उडूपीमध्ये जायचो. तिथे तीन-चार तास बसायचो. मग मी तिला घरी सोडायचो. तेव्हा रोज दरवेळी हिला भेटताना रोज एक गुलाब, चॉकलेट्स द्यायचो, असं चालू असायचं."

 सुलेखा तळवलकर काय म्हणाल्या?

दरम्यान, सुलेखा तळवलकर म्हणाल्या,"हा तेव्हाहीअतिशय चांगला होता आणि अजूनही तसाच आहे. तो माणूस म्हणून उत्तम आहे. त्यामुळे मित्र म्हणून मला त्याला कधीच गमवायचं नव्हतं. त्याचा सहवास कोणालाही हवाहवासा वाटेल असा आहे. तो खूप जॉली आहे, समोरच्या अगदी कम्फर्टेबल करतो. हे सगळं मला आवडायचं पण, जोडीदार म्हणून आयुष्यभर याच्याबरोबर राहायचं आहे का यासाठी मीच कन्फ्यूज होते. १६-१८ व्या वर्षी आम्ही भेटलो. आमची पन्नाशी चालू झाली. हा प्रवास एका अनोळखी व्यक्तीबरोबर कसा करायचा ती ओळण्याची प्रोसेस माझी तेव्हा चालू होती.मी बऱ्यापैकी याच्याबरोबर वेळ घालवला होता. त्यानंतर मला खात्री पटली की हाच तो मुलगा आहे ज्याच्यासोबत मी आयुष्य घालवू शकते."

English
हिंदी सारांश
Web Title : Sulekha Talwalkar's love story: Roses, chocolates, and an eight-month wait!

Web Summary : Actress Sulekha Talwalkar and her husband, Ambar, shared their love story. Ambar proposed, but Sulekha took eight months to say yes, during which he wooed her with daily roses and chocolates near Ruia College.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी