Join us

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:03 IST

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेला गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याचा योग आला

आज सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक भाविक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध मंडळांना भेट देत आहेत. अशातच मुंबईच्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीपासूनच अनेकांनी रांग लावली आहे. मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं गणोशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दर्शन घेतलं. ऋतुजाने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.

लालबागच्या राजाच्या चरणी ऋतुजा नतमस्तक

मराठी टेलिव्हिजन आणि नाट्यविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेने गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाला भेट दिली. यावेळी तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती पारंपरिक पेहरावात दिसत आहे. लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि मानाचा गणपती मानला जातो. दरवर्षी लाखो भाविक आणि अनेक सेलिब्रिटी त्याच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या वर्षी ऋतुजा बागवेलाही लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याचा योग आला.

ऋतुजाने मोठ्या श्रद्धेने गणपतीचे दर्शन घेतले आणि आपल्या कामासाठी तसेच कुटुंबासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना केली. ऋतुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लालबागच्या राजासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘लालबागच्या राजाचा विजय असो’ असं कॅप्शन तिने लिहिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या असून, अनेकांनी तिला 'बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत राहो' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुजाने काहीच दिवसांपूर्वी 'फुडचं पाऊल' नावाने स्वतःचं हॉटेल उघडलं. त्यानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी ऋतुजा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेली दिसली.

टॅग्स :गणेशोत्सव 2025लालबागचा राजाऋतुजा बागवेसेलिब्रिटी गणेश