Join us

बोल्ड अंदाजात ऋतुजाने रोखली नेटकऱ्यांवर नजर; अभिनेत्रीच्या एका कटाक्षामुळे चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 13:59 IST

Rutuja bagwe: अलिकडेच ऋतुजाने तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने रोखलेल्या नजरेमुळे नेटकरी घायाळ झाले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे (rutuja bagwe). उत्तम  अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ऋतुजा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह झाली आहे. यात अनेकदा ती तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यावेळीदेखील तिने असंच एक फोटोशूट केलं असून यात तिने रोखलेल्या नजरेमुळे चाहते घायाळ झाले आहेत.

'नांदा सौख्य भरे', चंद्र आहे साक्षीला अशा कितीतरी मालिकांमध्ये सालस, समंजस मुलीची भूमिका साकारणारी ऋतुजा खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. ती शेअर करत असलेल्या फोटोवरुन वेळोवेळी याचा प्रत्यय चाहत्यांना येत आहे.

अलिकडेच ऋतुजाने तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने रोखलेल्या नजरेमुळे नेटकरी घायाळ झाले आहेत. या फोटोमध्ये ऋतुजाने  शॉर्ट हेअर कट केला असून डोळ्यात काजळ लावलं आहे. तसंच डिप बॅक नेक असलेला काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तिचा हा लूक सध्या नेटकऱ्यांना आवडत असून त्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. 

टॅग्स :ऋतुजा बागवेसेलिब्रिटीटेलिव्हिजन