Join us

'अशोक मा.मा.' फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 11:50 IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने साखरपुडा केला असून सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी तिने सांगितली आहे

मराठी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने साखरपुडा केला आहे. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर रसिका वाखारकरने साखरपुडा केल्याची गोड बातमी समोर आली आहे. रसिकाने ही खास बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याशिवाय होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही दाखवला आहे. रसिकाने ही खास बातमी शेअर करताच अनेकांनी तिचं अभिनंदन केलाय. 

कोण आहे रसिकाचा होणार नवरा?

रसिका वाखारकरने सोशल मीडियावर नवऱ्याचा फोटो शेअर करत ही खास बातमी सर्वांना सांगितली आहे. रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शुभांकर उंब्रानी असं आहे. शुभांकर काम काय करतो, याविषयी अद्याप माहिती मिळू शकली नाही. तरीही गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर रसिका आणि शुभांकरने एकमेकांशी साखरपुडा केलाय, असं बोललं जातंय. रसिकाने काहीच दिवसांपूर्वी शुभांकरचा चेहरा लपवून प्रेमाची कबुली दिली होती. आज रसिकाने शुभांकरसोबत साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही खास बातमी सर्वांना सांगितली आहे.

अशाप्रकारे रसिकाने ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. रसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका वाखारकर. रसिका सध्या 'अशोक मा.मा.' या मालिकेत काम करत आहे. रसिका आणि शुभांकर साखरपुड्यानंतर लग्न कधी करणार, याची सर्वांना उत्सुकता  आहे. रसिका याविषयीची अपडेट सर्वांना लवकरच देईल, अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्नटेलिव्हिजन