Join us

प्रिया बापटची ही मालिका तुम्हाला आठवतीये का? बऱ्याच वर्षांनी समोर आला बालकलाकारांचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 14:13 IST

Priya bapat: प्रिया बापटच्या 'दे धमाल', 'शुभंकरोती', 'अधुरी एक कहानी' अशा तिच्या कितीतरी मालिका गाजल्या

मराठी कलाविश्वातील गुणी आणि तितकीच दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या प्रियाने कलाविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी सिनेमात काम करणाऱ्या प्रियाने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. अलिकडेच प्रियाने तिच्या एका गाजलेल्या मालिकेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

प्रिया बापटने लहानपणी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'दे धमाल', 'शुभंकरोती', 'अधुरी एक कहानी' अशा तिच्या कितीतरी मालिका गाजल्या. यामधल्याच एका मालिकेतील तिने फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे प्रियाची ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील प्रत्येक बालकलाकाराने त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. ही मालिका संपून बरेच वर्ष उलटले आहेत. मात्र, प्रियाने शेअर केलेला फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यासमोरही मालिका डोळ्यासमोर आली.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला असून ही मालिका कोणाच्या लक्षात आहे. या फोटोमध्ये मी कुठेय तुम्ही ओळखू शकता का? असं कॅप्शन दिलं आहे. तसंच तिने या फोटोतील काही कलाकारंना टॅगही केलं आहे. हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी अगदी बरोबर ही मालिका ओळखली आहे.

दरम्यान, हा फोटो दे धमाल या मालिकेतील आहे. या मालिकेतील कथानकासह त्याचं टायटल साँगही कमालीचं गाजलं होतं. 'शाळा सुटली दे धमाल, पाटी फुटली दे धमाल..असे बोल असलेलं हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं. 

टॅग्स :टेलिव्हिजनप्रिया बापटसेलिब्रिटीसिनेमा