Join us

प्राजक्ताचा बोल्ड अँड बिनधास्त अंदाज; फोटो होतायेत सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:38 IST

Prajakta mali: कायम पारंपरिक लूकमध्ये फोटो, व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या प्राजक्ताने यावेळी तिचा बोल्ड आणि बिनधास्त लूक चाहत्यांना दाखवला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम काही ना काही पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यावेळी प्राजक्ताने एक हटके व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कायम पारंपरिक लूकमध्ये फोटो, व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या प्राजक्ताने यावेळी तिचा बोल्ड आणि बिनधास्त लूक चाहत्यांना दाखवला आहे.

अलिकडेच प्राजक्ताने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता हटके लूकमध्ये दिसून येत आहे. डेनिम शॉर्ट वनपीसवर तिने त्याला मॅच होणारी अशी ज्वेलरी परिधान केली आहे. सोबतच हेअर स्टाइल सुद्धा केली आहे. त्यामुळे तिचा हा लूक सुद्धा प्रेक्षकांना भलताच आवडला आहे. 

दरम्यान, प्राजक्ता कायम पारंपरिक लूकमध्ये तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तर, काही वेळा ग्लॅमरस लूकमध्ये. परंतु, यावेळी तिने बोल्ड आणि बिनधास्त अशा हटके स्टाइलमध्ये फोटो पोस्ट केल्यामुळे ते चर्चेत येत आहेत. 

टॅग्स :प्राजक्ता माळीटेलिव्हिजनसेलिब्रिटी