Join us

घटस्फोटामुळे चर्चेत होती ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, लवकरच या मालिकेतून येते रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:40 IST

आजही पल्लवी पाटील 'रुंजी' मालिकेमुळेच जास्त चाहत्यांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमादर एंट्री करण्यासाठी पल्लवी सज्ज आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. त्याच बरोबर कलाकारही रसिकांचे तितकेच आवडीचे बनतात. त्यांच्या रिल लाईफ प्रमाणे रिअल लाईफमध्ये काय सुरु आहे. हे जाणून घेण्याचीही रसिकांना फार उत्सुकता असते. लवकरच पल्लवी पाटील छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार आहे. पल्लवी पाटील तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. 

मुळात पल्लवी पाटील तिच्या बोल्ड लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. मालिकेत अतिशय साध्या अंदाजात आपण पल्लवीला पाहिले असणार मात्र रिअल लाईफमध्ये ती खूपच स्टाईलिश आणि बोल्ड आहे. सोशल मीडियावर तिचे एकसे बढकर एक फोटो शेअर करत चाहत्यांच्याही वाहवा मिळवताना दिसते.

लॉकडाऊन दरम्यान अनेक कलाकर त्यांच्या खासगी कारणामुळेच जास्त चर्चेत राहिले. काही त्यांच्या लग्नामुळे तर काही त्यांच्या घटस्फोटामुळेही चर्चेत राहिले. अनेकांना माहिती नसेल पण पल्लवी पाटीलही तिच्या घटस्फोटामुळेच चर्चेत होती. पल्लवी पाटीलचे अभिनेता संग्राम समेळसोबत लग्न झाले होते.  2016 दोघांनीही लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. पण दोघांचेही नाते फार काळ काही टिकले नाही. त्यामुळे दोघांनीही घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यानंतर संग्राम समेळनेश्रद्धा फाटकसोबत दुसरे लग्नही केले. 

रुंजी या मालिकेमुळे पल्लवी पाटीलला एक वेगळीच लोकप्रियता मिळाली होती.आजही पल्लवी पाटील 'रुंजी' मालिकेमुळेच जास्त चाहत्यांच्या लक्षात आहे.  आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमादर एंट्री करण्यासाठी पल्लवी सज्ज आहे. पल्लवी पाटील ही सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या 'वैदही' या मालिकेत दिसणार आहे. मालिकेतून हटके भूमिकेतून ती रसिकांच्या भेटीला येणार आहे. पल्लवी पाटीलनं बापमाणूस, रुंजी, अग्निहोत्र 2 अशा मालिकांमधून आपला ठसा उमटवला आहे.

टॅग्स :पल्लवी पाटीलसंग्राम समेळ