Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीचवर बिकीनी घालून सुपर हॉट झाली मराठी अभिनेत्री, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "समुद्र सुंदरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:14 IST

एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा बिकिनीतील व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. 

सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्रीही त्यांचे वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा बिकिनीतील व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. 

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती काळ्या रंगाच्या बिकिनीत समुद्रकिनारी दिसत आहे. या व्हिडिओत अभिनेत्राचा सुपर हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. "A little slice of heaven on Earth", असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. अभिनेत्रीचा बिकिनीतील बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील आहे. पल्लवीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला 'समुद्र सुंदरी' असं म्हटलं आहे. 

पल्लवी पाटील ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'सविता दामोदर परांजपे', 'ट्रिपल सीट', 'बॉईज २', 'शेंटिमेंटल' यांसारख्या सिनेमात ती झळकली आहे. 'नवा गडी नवा राज्य' या मालिकेतही तिने मुख्य भूमिका साकारली होती. पल्लवीने काही हिंदी प्रोजेक्टमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :पल्लवी पाटीलटिव्ही कलाकार