Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील 'या' मालिकेत साकारणार आगळीवेगळी भूमिका; प्रोमो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 09:16 IST

मुक्ता बर्वेची कलर्स मराठीवरील मालिकेत हटके एन्ट्री झालीय. मुक्ताचे चाहते यामुळे खूप उत्सुक झाले आहेत (mukta barve)

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', 'अजूनही बरसात आहे' अशा मालिकांमध्ये मुक्ताने अभिनय केलाय. मुक्ताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुक्ता बर्वे तीन वर्षांनी पुन्हा एकदा टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करुन कलर्स मराठीवरील मालिकेत ती अभिनय करताना दिसणार आहे.

मुक्ता बर्वेची या मालिकेत हटके एन्ट्री

मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेत झळकणार आहे.  मुक्ताची भूमिका असणारा मालिकेचा प्रोमो काल रात्री रिलीज करण्यात आला. या प्रोमोत आलिशान गाडीतून मुक्ताची एन्ट्री होते. तिने साडी नेसली असते आणि पायात स्पोर्ट्स शूज घातले असतात. पुढे आनंदीबाई मुक्ताला हार घालायला जातात. पण मुक्ता त्यांना बाजूला सारुन इंदू आणि तिच्या गँगसोबत मनसोक्त खेळते. अशाप्रकारे विठूच्या वाडीतील नव्या पाहुणीच्या भूमिकेत मुक्ता बर्वेची हटके एन्ट्री होणार.

कधी बघायला मिळणार हा विशेष भाग?

मुक्ता बर्वेची आगळीवेगळी भूमिका असलेला 'इंद्रायणी' मालिकेचा हा विशेष भाग १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता बघायला मिळणार आहे. 'इंद्रायणी' मालिकेच्या निमित्ताने तीन वर्षांनी मुक्ताची मराठी मालिकेत एन्ट्री होते. याआधी मुक्ता आपल्याला २०२१ मध्ये सोनी मराठीवरील 'अजूनही बरसात आहे' मालिकेत पाहायला पाहायला मिळाली होती. या मालिकेनंतर तीन वर्षांनी 'इंद्रायणी' मालिकेच्या निमित्ताने मुक्ताने कमबॅक केलंय. यानिमित्ताने मुक्ता बर्वे आणि अनिता दाते या दोघींच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळेल.

टॅग्स :मुक्ता बर्वेकलर्स मराठीअनिता दाते