Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लोक मला ऐश्वर्या राय का म्हणतात?'; मानसी नाईकने सांगितलं कारण, शेअर केला कॉलेजचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 18:51 IST

मानसी नाईक किस्सा सांगताना म्हणाली...

मराठी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या सुंदर मोठ्या घाऱ्या डोळ्यांमुळे ओळखली जाते. इंडस्ट्रीत तिचेच डोळे असे आहेत. मानसीला कायम ऐश्वर्या रायसारखी दिसते अशी कॉम्प्लिमेंट मिळते. मानसीने अभिनयात पदार्पण केलं तेव्हाच तिच्या लूकची तुलना ऐश्वर्या रायशी केली गेली. मानसी नाईकने स्वत:च आता यामागचं कारण सांगितलं आहे. 

मानसी नाईकला केवळ इंडस्ट्रीतच नाही तर आधीपासूनच ऐश्वर्या राय बोललं जातं. अगदी कॉलेजपासूनच तिला ही कॉम्प्लिमेंट मिळाली आहे. याचा किस्सा सांगताना मानसी म्हणाली, "तेव्हा 'देवदास'चित्रपट रिलीज झाला होता. मी कॉलेजमध्ये होते. मी कधी पंजाबी ड्रेस घालून गेले तर माझी एक सवय होती मी बन बांधून मला पेन पेन्सिल गोळा करायचे. ते मी बनमध्ये अडकवायचे. माझे सीनिअर मित्र मला थांबवून देवदासचा 'इश्शsss' वाला आयकॉनिक सीन करायला लावायचे. फर्ग्युसनची ऐश्वर्या राय असं मला म्हणायचे. तो माझ्यासाठी कडक मोमेंट होता. त्यामुळे कॉलेजमधल्या मित्रांपासूनच मला ती कॉम्प्लिमेंट मिळणं सुरु झालं होतं."

मानसी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत असते.   'गुलाबी नोट', 'बाई वाड्यावर या', 'मस्त चाललंय आमचं' या गाण्यांमुळे मानसीला लोकप्रियता मिळाली. मानसीने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.दरम्यान मानसी नाईकने १९ जानेवारी २०२१ साली प्रदीप खरेराशी लग्नगाठ बांधली होती. परंतु, नंतर वाद झाल्याने त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नुकतंच मानसीने नवीन घरही घेतलं आहे. 

टॅग्स :मानसी नाईकऐश्वर्या राय बच्चनमराठी अभिनेता