Join us

'आई कुठे काय करते' फेम मधुराणीने लेकीसोबत शेअर केला फोटो, म्हणाली, 'माझं मन...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:24 IST

मधुराणी मालिकेत जशी प्रेमळ आई आहे तशीच ती खऱ्या आयुष्यातही एका गोंडस मुलीची आई आहे.

लोकप्रिय मराठी मालिका 'आई कुठे काय करते' मधून मधुराणी प्रभूलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) घराघरात पोहचली. मालिकेतील तिने साकारलेली अरुंधती अनेकांना भावली. तिला मधुराणी नाही तर अरुंधती याच नावाने चाहते हाक मारतात. मालिकेत ती जशी प्रेमळ आई आहे तशीच ती खऱ्या आयुष्यातही एका गोंडस मुलीची आई आहे. आपल्या लेकीसोबतचा एक गोड फोटो मधुराणीने सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे.

सध्या नवरात्रोत्सव सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे.  हे नऊ दिवस स्त्री शक्तीचा जागर करण्यात येत आहे. तसंच नऊ दिवस नऊ रंगांचंही महत्व आहे. आजचा रंग पिवळा आहे. आजच्या दिवशी मधुराणीने पिवळ्या रंगाची साडी नेसत फोटो पोस्ट केला आहे. नाकात नथ, गळ्यात हार, कपाळी चंद्रकोर असा पारंपारिक मराठमोळा लुक तिने केला आहे. हा फोटो खास आहे कारण यामध्ये तिची लेक स्वरालीही आहे. मधुराणी लेकीकडे अतिशय प्रेमाने बघत आहे. हा मायलेकींचा गोड फोटो प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. मधुराणीने हा फोटो पोस्ट करत 'आई झाल्यानंतर माझी झोळी जरी भरली असली तरी माझं मनही भरलं आहे' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

मधुराणीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 'मायलेकी अनोखं प्रेम असतं शब्दात व्यक्त करता येत नाही' अशी कमेंट एकीने केली आहे. मधुराणी नेहमीच लेकीसोबतचे फोटो, व्हिडिओ अपलोड करत असते. काही दिवसांपूर्वीच मायलेकी ऑस्ट्रेलिया ट्रीपवर जाऊन आल्या. मधुराणी शूटनिमित्त मुंबईत राहते तर तिची लेक स्वराली पुण्यात शाळेत शिकत आहे.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरमराठी अभिनेताआई कुठे काय करते मालिकाव्हायरल फोटोज्