Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासूबाईंनी दणक्यात साजरी केली हृताची पहिली मंगळागौर; पाहा सासू-सुनेचा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:46 IST

Hrutha durgule: नुकतीच हृताची पहिली मंगळागौर पार पडली असून तिच्या सासूबाईंनी तिला 'बस बाई बस'च्या मंचावर हे खास सरप्राइज दिलं.

छोटा पडदा ते रुपेरी पडदा असा प्रवास करुन प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही अनेकदा चर्चेत येणाऱ्या हृताने काही महिन्यांपूर्वीच प्रतिक शाहसोबत थाटात लग्न केलं. त्यामुळे सध्या ती तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे नुकतीच हृताची पहिली मंगळागौर पार पडली असून तिच्या सासूबाईंनी तिला 'बस बाई बस'च्या मंचावर हे खास सरप्राइज दिलं.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बस बाई बस या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये हृता आणि तिची सासू अभिनेत्री मुग्धा शाह यांनी हजेरी लावल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या मंचावरच हृताची लग्नानंतरची पहिली मंगळागौर पार पडली. यावेळी हृता आणि मुग्धा या दोघींनी मंगळागौरीचे खेळ सादर केले.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हृताचा मंगळागौरीचे खेळ खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हृताने प्रसिद्धी टीव्ही दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्न केलं आहे. प्रतिकने 'बेहद २', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदडी', 'इक दिवाना था' या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तर, प्रतिकची आई आणि हृताची सासूदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. 'बे दुणे साडे चार', 'मिस मॅच', 'माहेर माझं हे पंढरपूर', 'संभव असंभव' सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत.  

टॅग्स :ऋता दूर्गुळेटेलिव्हिजनसेलिब्रिटी