Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री गायत्री दातार अडकली लग्नबंधनात, ग्रँड विवाहसोहळ्याचा VIDEO आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:51 IST

अभिनेत्री गायत्री दातार हिचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला आहे.

मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी मंडळींनी लग्नगाठी बांधल्या. आज 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार हिचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला आहे. श्रीकांत चवरेसोबत गायत्रीनं नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्रीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पुण्यातील भोर येथे गायत्रीचा ग्रँड लग्नसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये गायत्री दातार आणि श्रीकांत हे एकमेकांना वरमाळा घातलाना दिसत आहेत. वरमाळा घालताना श्रीकांतला त्याच्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेतल्याचं दिसलं. यावर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं मैत्रिण गायत्रीला उचलून घेतलं आणि तिनं नवऱ्याच्या गळ्यात हार घातला. गायत्रीने लग्नात लाल रंगाची साडी नेसली आहे. तर, श्रीकांतने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती. गायत्रीच्या लग्नाला सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, अक्षय केळकर ही कलाकार मंडळी उपथित होती.

श्रीकांत आणि गायत्रीची पहिली भेट कशी झाली?

गायत्री आणि श्रीकांत या दोघांची भेट डेटिंग अ‍ॅपवर झाली होती.  दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री झाली. सर्वात आधी तिनं आपलं नाव फक्त गायत्री आहे, असं सांगितलं. नंतर श्रीकांतला गायत्री अभिनेत्री असल्याची माहिती मिळाली. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. गायत्रीचा नवरा श्रीकांतने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केल्यानुसार IIT Bombay मधून त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तो ड्रोन फोटोग्राफर आहे. श्रीकांतला ट्रॅव्हल व फोटोग्राफीची आवड आहे.

दरम्यान, गायत्री दातार ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेतून ती नावारुपाला आली. त्यानंतर 'अबीर गुलाल' मालिकेत ती दिसली होती. शिवाय 'बिग बॉस मराठी' आणि 'चल भावा सिटीत' या रिएलिटी शोमध्ये गायत्रीने सहभाग घेतला होता. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Gayatri Datar Ties Knot: Grand Wedding Video Surfaces

Web Summary : Actress Gayatri Datar, known for 'Tula Paahte Re,' married Shrikant Chavare in a grand ceremony in Pune. The couple met on a dating app and their friendship blossomed into love. Celebrities attended the wedding, showering blessings on the newlyweds.
टॅग्स :गायत्री दातार