Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझं नाव नीट ऐका...", ज्ञानदाने उखाण्यातून सांगितली अख्खी लव्हस्टोरी; हर्षदसोबत बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 10:21 IST

लग्नात ज्ञानदाने घेतलेला उखाणा आता व्हायरल होतोय. या उखाण्यातून तिने हर्षदसोबतची सुरुवातीपासूनच लव्हस्टोरीच सांगितली आहे.

टीव्हीवरची अप्पू आणि आता काव्या म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर काल लग्नबंधनात अडकली आहे. सिनेमॅटोग्राफर हर्षद गायकवाडसोबत तिने साताजन्माची गाठ बांधली. हर्षद आणि ज्ञानदा अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आज त्यांनी नात्याला नवं नाव देत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नात ज्ञानदाने घेतलेला उखाणा आता व्हायरल होतोय. या उखाण्यातून तिने हर्षदसोबतची सुरुवातीपासूनच लव्हस्टोरीच सांगितली आहे.

ज्ञानदाने घेतलेला उखाणा असा की, "एका शॉर्टफिल्मच्या शूटला भेटलो होतो आम्ही
तेव्हा अजिबात माहित नव्हतं हेच होणारेत माझे स्वामी
त्याने हातात धरलेला कॅमेरा, मी केलेली अभिनयाची निवड
कामात पुरते गुंतून गेलो एकमेकांना भेटायला नव्हती सवड
फोन, व्हॉट्सअॅप, व्हिडीओ कॉल्सने सोपं केलं जगणं
आता तुझ्या पॅकअपनंतरचा वेळ हेच होतं दोघांचंही मागणं
काम करत राहिलो, एकमेकांना समजून घेतलं
कसं कधी कळलंच नाही पण हे लाँग डिस्टन्स प्रेम फुलत गेलं
तो होता पुण्यात मी होते मुंबई मग आठवण यायला लागली
त्या आठवणीतच बहुतेक प्रेमाची गाठ अजून घट्ट झाली
सतत सांगत राहिलो एकमेकांना कामावर फोकस कर
योग्य वेळ आल्यावर होणारच आहोत आपण एकमेकांचे वधूवर
आता कळतंय त्यावेळी एकमेकांना केलेला सपोर्टच महत्वाचा होता
डोळे भरुन येतात ते सगळं मागे वळून बघताना
आता त्याच्या कॅमेरा, लेन्स, लाईट्स आणि फोकसला मी सुद्धा समजून घेतलंय
माझ्या आयुष्यातल्या अभिनयाच्या रसांना त्यानेही आपलंसं केलंय
आज लग्न झालंय आमचं इथून पुढे आमच्या प्रेमात होत राहील सदैव वाढ
हर्षद रावांचं नाव घेते माझं पूर्ण नाव नीट ऐका ज्ञानदा हर्षद गायकवाड."


ज्ञानदाचा हा उखाणा ऐकून हर्षदही भारावून गेला. त्याने तिला जवळ घेत कपाळावर किस करत प्रेम व्यक्त केलं. लग्नात ज्ञानदाने मराठमोळा पारंपरिक लूक केला होता. नऊवारी नेसून ती नटली होती. मोत्याचे पारंपरिक दागिने घातल्याने ज्ञानदाचा लूक आणखीनच खुलून दिसत होता. तर हर्षदने धोतर आणि कुर्ता परिधान केला होता. वरमालासाठी ज्ञानदाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर हर्षदने सूट घातला होता. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

ज्ञानदाचा नवरा हर्षद हादेखील कलाविश्वात कार्यरत आहे. तो शिवसेना विभागप्रमुख दमयंती गायकवाड यांचा मुलगा आहे. हर्षद एक सिनेमेटोग्राफर आहे. २०१५ मध्ये एका शॉर्टफिल्मच्या शूटिंगदरम्यान ते  पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळेस हर्षद मुंबईत राहत नव्हता. इथूनच एका सुंदर नात्याची गुंफण सुरू झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये ओळख निर्माण झाली. २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला प्रपोज करत त्याच्या मनातील भावना सांगितल्या. आता लग्न करत दोघांनीही कायम सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Dnyanada Ramtirthkar weds cinematographer Harshad Gaikwad; love story in wedding vows.

Web Summary : Actress Dnyanada Ramtirthkar married cinematographer Harshad Gaikwad. Their love story began during a short film shoot and blossomed despite the long distance. Dnyanada shared their journey in a heartfelt wedding vow, highlighting their mutual support and understanding. The wedding photos are now viral.
टॅग्स :मराठी अभिनेतालग्नव्हायरल व्हिडिओटिव्ही कलाकार