Join us

"डिलिव्हरीनंतर वर्षभर घराबाहेर पडले नाही कारण..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला वेदनादायी अनुभव

By देवेंद्र जाधव | Updated: March 31, 2025 16:11 IST

आई झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीने तिला आलेला काहीसा वेगळा अनुभव सांगितला आहे. या अभिनेत्रीने आई कुठे काय करते मालिकेत काम केलंय

'आई कुठे काय करते' मालिका चांगलीच गाजली. या मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेला खूप लोकप्रियता मिळाली. रुपालीआधी 'आई कुठे..'मध्ये ही भूमिका दीपाली पानसरे ही अभिनेत्री साकारायची. दीपालीने मज्जाला दिलेल्या मुलाखतीत आई झाल्यानंतर तिला आलेला अनुभव सांगितला आहे. दीपाली म्हणते की, "रुहान झाल्यानंतर माझं वजन ५० किलोवरुन डायरेक्ट ८५ किलोवर गेले होते. कारण मला थोडा placenta low होता."

"चार महिने मला बेडरेस्ट होती. उभंच राहायचं नव्हतं. त्यामुळे माझं वजन भयंकर वाढलं होतं. तो वेळ मी पिकनीकसारखा घालवला. खायचं, प्यायचं आणि मजा करायची. डिलिव्हरी झाल्यानंतर ऑलरेडी बाईला फिल होत असतं की, आपला लूक चेंज झालाय. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांचा या गोष्टीवर परिणाम होतो."

"मी घरातून बाहेर पडत नव्हते. तेव्हा रुहान ३ वर्षांचा असेल, माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की, तिचा साखरपुड्याची अंगठी घ्यायची होती. तर तिने मला येतेस का विचारतं. मी गेले तिला भेटायला. तिथे मैत्रिणीची बहीणही सोबत होती. तिने माझ्याकडे पाहून, 'हे काय केलंय तू स्वतःचं.', असं म्हणाली. ती जेव्हा अशी म्हणाली तेव्हा मी तिला सांगितलं की, मला मूल झालंय. तेव्हा तिने 'म्हणून काय झालं', असं विचारलं. 'हे असं, हे असं', म्हणत तिने वाढलेल्या वजनावर बोट दाखवलं. त्यानंतर १ वर्ष मी घराबाहेर पडले नाही. माझे रुहानसोबत जास्त फोटो नाहीयेत, कारण मला प्रत्येकवेळी फील व्हायचं की, काय झालंय माझं, मी काय करुन घेतलंय स्वतःचं." 

"त्यामुळे एखादी बाई या सर्व फेजमधून जात असेल तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी तिला खूप जपायला हवं. तिला प्रोत्साहन द्यायला हवं. त्या घटनेनंतर मी घरी आले आणि नवऱ्याला विचारलं की, मी इतकी वाईट दिसतेय का. तो म्हणाला जाऊदे, तुझ्यावर जळत असेल. तू अजूनही छान दिसतेस, काय टेंशन नाही.  त्यामुळे सपोर्टिव्ह लोक आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे."

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजन