Join us
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात कमबॅक! अभिनेत्री अनिता दातेची टेलिव्हिजनवर जबरदस्त एन्ट्री, 'या' मालिकेत झळकणार; प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:19 IST

'माझ्या नवऱ्याची बायको' मधील राधिका टीव्हीवर परतली! 'या' लोकप्रिय मालिकेत मालिकेत साकारणार महत्वपूर्ण भूमिका, प्रेक्षक उत्सुक

Television: हल्ली छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सतत नवनवीन ट्वि्स्ट येत असतात. त्यामुळे या मालिकांमध्ये पुढे काय घडणार, त्यातील पात्रे यांविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते.असाच काहीसा बदल झी मराठीवरील सनई चौघडे मालिकेत पाहायला मिळतो आहे. या बहुचर्चित मालिकेत आता टीव्हीची लोकप्रिय नायिका पुन्हा एकदा वाहिनीवर कमबॅक करणार असून सोशल मीडियावर मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्याने मालिका रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


दरम्यान, झी मराठी वाहिनीवर अलिकडेच सनई चौघडे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे,  मेघना एरंडे, चिन्मयी साळवी आणि सुहास शिरसाट या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  आपल्या चार मुलींच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या आईची कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. अशातच या मालिकेच्या माध्यमातून एक लोकप्रिय चेहरा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अनिता दाते आहे. 

प्रसिध्द अभिनेत्री अनिता दाते बऱ्याच वर्षांनी वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करत आहे. 
अनिता दातेची प्रमुख भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका चांगलीच गाजली होती. २०१६ साली या मालिकेचा पहिला भाग आला होता. जवळपास ४ ते ५ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेत तिने साकारलेली राधिकाची भूमिका अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत.अनिता दाते आता 'सनई चौघडे' या मालिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत देखील तिच्या भूमिकेचे नाव राधिका सुभेदार असं आहे.

असेच आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याची पाठमोरी झलक पाहायला मिळतेय.  अभिनेत्याचा प्रोमोमधील लूक पाहून प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Anita Date's comeback on television with 'Sanai Chaughade'; promo goes viral.

Web Summary : Anita Date, famed for 'Mazhya Navryachi Bayko,' returns to TV after years in 'Sanai Chaughade' as Radhika Subhedar. The show features Raj Hanchnale, Meghna Erande, and Chinmayi Salvi. A promo has been released, sparking excitement among fans for her role.
टॅग्स :अनिता दातेटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया