Join us

PICS : पुन्हा एकदा शुभमंगल सावधान! सोनालीनंतर ‘या’ अभिनेत्रीनं लग्नाच्या वाढदिवशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:25 IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा एकदा विधिवत लग्न केलं. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (Sonalee Kulkarni) लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा एकदा विधिवत लग्न केलं. गेल्या वर्षी 7 मे रोजी सोनालीनं कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली होती. मात्र कोरोना महामारीमुळे या लग्नात अगदी घरची मंडळीही सहभागी होऊ शकली नव्हती. त्यामुळे अलीकडे लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी कुटुंबीय व पाहुण्यांच्या उपस्थित तिने पुन्हा एकदा कुणालशी विधिवत लग्न केलं. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे.

 होय, राधा प्रेम रंगी रंगली,फ्रेशर्स,लव्ह लग्न लोचा यासारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया गुरव (Akshaya Gurav) हिने नुकतीच नवऱ्यासोबत पुन्हा लग्नगाठ बांधली. लग्नाच्या वाढदिवसाच्या मुहूर्ताला अक्षया आणि तिचा पती भूषण वाणी  यांनी घरची मंडळी आणि मित्र मैत्रिणींच्या सानिध्यात पुन्हा एकदा थाटामाटात लग्न केलं. या पुनश्च: लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 शेअर केलेल्या फोटोंमध्ये अक्षयाने पिवळी साडी नेसलीय तर भूषणने छान सदरा घालताय. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घातले असून दोघेही एकमेकांकडे पाहत रोमॅन्टिक पोझ देताना दिसत आहेत.   फोटोंसोबत अक्षयाने दोघांचा डान्स रिल्स देखील शेअर केला आहे.  अक्षयाने लग्नानंतरचे हनिमूनचे फोटो देखील शेअर केले आहेत.

अक्षयाने 2017मध्ये भूषण वाणीसोबत विवाह केला. भूषण देखील सिनेसृष्टीशी निगडीत आहे. तो सिनेमॅटोग्राफर आहे.  लव-लग्न-लोचा या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहचली. या मालिकेत तिने साकारलेली सौम्या ही भूमिका रसिकांना चांगलीच भावली होती. या भूमिकेनं तिला नवी ओळख मिळवून दिली होती. या मालिकेआधी अक्षयाने मेंहदीच्या पानावर, मानसीचा चित्रकार तो या मालिकेत काम केलं आहे. याशिवाय ‘फेकमफाक’ या सिनेमातही अक्षयानं काम केलं आहे.