Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाठकबाईंचा नादखुळा ! अक्षयाचे फोटो बघून राणादा काय तुम्हीही पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:35 IST

फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे तिची अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ही पाठक बाई म्हणून घराघरात प्रसिद्ध झाली होती.‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhat Jeev Rangala) या मालिकेतून तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले. अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकलीत. त्यामुळे मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी आजही तिला पाठकबाई म्हणूनच लोक ओळखतात.

अक्षया देवधर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी तिच्याशी निगडीत खास अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. नुकताच अक्षयाने तिचे असाचे काही फोटो शेअर करत अनेकांचं लक्ष तिने वेधून घेतलं आहे. फोटोतील अक्षयाच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत. ब्युटीफुल, गॉर्जिअस, प्रिटी, लय भारी अशा कमेंट्स अक्षयाचे फॅन्स या फोटोंवर करतायेत. 

दरम्यान या फोटोंमध्ये अक्षया एक खुर्चीत बसलेली दिसतेय. पिवळ्या रंगाचा टॉप आणि हिरव्या रंगाचा स्कर्ट तिने या घातलेला दिसतोय. नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास या फोटोंमध्ये  पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :अक्षया देवधरटिव्ही कलाकार