Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणादासोबत सिंगापूरला पोहोचल्या पाठकबाई, अक्षया आणि हार्दिक घेतायेत सुट्ट्यांचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 13:24 IST

राणादा आणि पाठकबाई सध्या विदेश दौऱ्यावर आहे. दोघे सिंगापूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतायेत.

तुझ्यात जीव रंगला म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडलेली जोडी म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar) आणि हार्दिक जोशी (hardik joshi). या दोघांनी पहिल्यांदाच एका मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली आणि या मालिकेच्या सेटवरच ते प्रेमात पडले. विशेष म्हणजे मैत्रीपासून सुरु झालेला यांचा प्रवास लग्नापर्यंत येऊन पोहोचला. ४ डिसेंबरला या जोडीने लग्न केलं. लग्नानंतर ही जोडी त्यांच्यातील प्रेमामुळे सातत्याने चर्चेत येत आहे.

राणादा आणि पाठकबाई सध्या विदेश दौऱ्यावर आहे. दोघे सिंगापूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतायेत. दोघांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अक्षयने अलिकडेच एका व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती बोटमध्ये उभी दिसतेय. बॅकग्राऊंडला दिल चाहता है सिनेमातील गाणं सुरु आहे. या व्हिडीओत आजूबाजूला सुंदर सिंगापूर शहर  दिसतेय.

राणादाने ही त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुन एक सेल्फि शेअर केला आहे. यात ब्ल्यू करलच्या टी-शर्टमध्ये हार्दिक हँडसम दिसतोय. सिंगापूर डायरीस असा हॅशटॅग त्याने या फोटोसह दिलाय.

दरम्यान, 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवर ही जोडी प्रेमात पडली. आणि, त्यानंतर या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. सध्या अक्षया कोणत्याही मालिकेत दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. तर, हार्दिक सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत दिसत आहे.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशी