Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पुन्हा नकारात्मक भूमिका करणं...", रुपाली भोसले नेमकं काय म्हणाली? वक्तव्याने वेधलं लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:56 IST

रुपाली भोसले ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Rupali Bhosle: रुपाली भोसले (Rupali Bhosle) हे नाव मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रींच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर येतं. 'आई कुठे काय करते' या मालिकेत तिने साकारलेल्या संजना या पात्रामुळे तिला खरी ओळख मिळाली. मधुराणी प्रभुलकर आणि मिलिंद गवळी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अगदी काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतील मुख्य नायिका म्हणजेच अरुंधतीला प्रेक्षकांनी जेवढं प्रेम दिलं तितकंच प्रेम खलनायिकेचं पात्र साकारणाऱ्या संजनाला मिळालं. अशातच सध्या अभिनेत्री रुपाली भोसले तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

नुकताच 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५' मोठ्या दिमाखात पार पडला. त्यादरम्यान, रुपाली भोसलेला पुन्हा कोणती भूमिका करायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आपली प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, "मला हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला की तू एवढी वर्षे 'आई कुठे काय करते' मध्ये नकारात्मक भूमिका साकारलीस आता जर तुला नकारात्मक भूमिकेची ऑफर मिळाली तर तूझं उत्तर काय असेल. तर त्यावर माझं एकच उत्तर असतं की, नक्कीच मला नकारात्मक भूमिका करायला आवडेल. कारण गेल्या पाच वर्षात मी प्रेक्षकांना जे काही दिलंय किंवा मी प्रेक्षकांना काय देऊ शकते? हे बघितलं."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "म्हणून आता माझ्या बकेट लिस्टमध्ये प्रेक्षकांना काय देण्यासारखं आहे, हे मला बघायला खूप आवडेल. माझ्यासाठी ते आव्हानात्मक असेल. त्यामुळे पुढे काय होतंय हे पाहूया...",असं खुलासा रुपाली भोसलेने केला.

वर्कफ्रंट

रुपाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. याशिवाय काही हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. 

टॅग्स :रुपाली भोसलेटेलिव्हिजनसेलिब्रिटी