Join us

'पावसाळा संपत आला, येईल आता..' पाठकबाईंचा हटके उखाणा; मंगळागौरीला हार्दिकनेही धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 13:03 IST

अक्षयाच्या मंगळागौरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

मराठी अभिनेत्री अक्षया देवधरची (Akshaya Deodhar) लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर थाटात साजरी झाली. 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत राणादा आणि पाठकबाईंनी खऱ्या आयुष्ययातही संसार थाटला. लग्नानंतर आलेला प्रत्येक सण हा खास असतो. तशीच मंगळागौरही विशेष आहे. हार्दिकने जोशीने (Hardik Joshi) स्वत: मंगळागौर कार्यक्रमात हजेरी लावत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. हार्दिक फक्त आला नाही तर त्याने बायकोसोबत खेळही खेळले. अक्षयाच्या मंगळागौरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षयाने हिरवी साडी, नाकात नथ, साजेसे दागिने आणि केसात गजरा अशा पारंपारिक लुकमध्ये एंट्री घेतली. तर हार्दिकने गोल्डन रंगाचा सदरा आणि हिरव्या रंगाची धोती घातली होती. नवरा बायको कार्यक्रमात अतिशय गोड दिसत होते. दोघांनी शंकराची पूजा केली. नंतर उत्साहात मंगळागौरीचे खेळ सुरु झाले. दरम्यान हार्दिकही स्वत: अक्षयासोबत दिलखुलासपणे खेळत होता. 'पिंगा गं पोरी' वर हार्दिकनेही ताल धरला. 

दरम्यान या सोहळ्यात अक्षयाने एक खास उखाणा घेतला. 'पावसाळा संपत आला...येईल आता हिवाळा..हार्दिक रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या कार्यक्रमात छान पार पडला मानसीचा सोहळा.' अक्षयाचा उखाणा घेतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

हार्दिक आणि अक्षयाच्या या मंगळागौरीचा थाट बघून चाहत्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केलाय. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हार्दिक आणि अक्षयाने २ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपे वाड्यात हा लग्नसोहळा पार पडला.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीमराठी अभिनेतातुझ्यात जीव रंगला