Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनील बर्वेंचं मालिकाविश्वात पुनरागमन, रक्षाबंधननिमित्ताने 'या' मालिकेत करणार दणक्यात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:07 IST

अभिनेते सुनिल बर्वेंच्या भूमिकेचा दमदार प्रोमो समोर आला असून रक्षाबंधननिमित्ताने सुनील एका खास मालिकेत झळकणार आहेत (sunil barve)

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते सुनील बर्वे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिका, सिनेमे, नाटकविश्वात लोकप्रिय आहेत. सुनील बर्वेंनी आजवर विविध माध्यमांत चांगल्या भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. सुनील बर्वे नुकतेच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिकेत झळकले. सुनील बर्वेंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुनील बर्वे पुन्हा एकदा मराठी मालिकाविश्वात कमबॅक करत आहेत.

या मालिकेत सुनील बर्वे झळकणार

अभिनेते सुनील बर्वेंच्या नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज झालाय. सुनील बर्वे झी मराठीवरील 'पारु' या मालिकेत एन्ट्री घेणार आहेत. 'पारु' मालिकेतील सुनील बर्वेंच्या भूमिकेचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. प्रोमोत 'या रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर दुरावलेली भावंडे एकत्र येतील का?' असं कॅप्शन देऊन सुनील बर्वेंच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. अहिल्याच्या भावाच्या भूमिकेत सुनील बर्वेंची एन्ट्री होणार आहे. 

'पारु' मालिकेत येणार नवा ट्विस्ट

'पारु' मालिकेत सुनील बर्वेंच्या एन्ट्रीने मालिकेत नवीन ट्विस्ट अँड टर्न येणार हे निश्चित. दरम्यान सुनील बर्वेंच्या या नवीन प्रोमोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. सुनील बर्वेंनी याआधी स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत अभिनय केलाय. या मालिकेत सुनिल बर्वेंनी साकारलेली सूर्यादादाची भूमिका चांगलीच गाजली. सुनिल बर्वेंच्या एन्ट्रीने 'पारु' मालिकेत कोणतं नवं वळण येणार हे पाहावं लागेल.

टॅग्स :सुनील बर्वेझी मराठीमराठी