Join us

मराठमोळ्या अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 12:45 IST

मराठी टेलिव्हिजनवरील आणखी एक अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला आहे.

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही महिन्यात लग्नबेडीत अडकले आहेत. शिवानी सुर्वे, तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, योगिता चव्हाण-सौरभ चौघुले, प्रथमेश परब, पूजा सावंत या कलाकारांचे लग्न पार पडले. दरम्यान आता मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत. हा अभिनेता म्हणजेच प्रतीक पाटील.

अभिनेता प्रतीक पाटील याचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. निकिता पाटील हिच्याशी प्रतीक लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, होकाराने कायमस्वरूपी एकत्र येत आहोत. या साखरपुड्यानिमित्त हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी त्यांचे खास अभिनंदन केलेले पाहायला मिळत आहे. 

प्रतीकने झी मराठीच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून सुहासची भूमिका साकारली होती. हार्दिक जोशी सोबत काम करताना त्यांची खूप छान मैत्री जुळून आली होती. हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नात प्रतीक आवर्जून उपस्थित राहिला होता. प्रतीक पाटीलने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत दिसला होता.