Join us

'आपण स्वत:ला बदलायचं'; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 17:00 IST

Kushal badrike: कुशल बद्रिकेने जीवनाचं सार सांगणारी एक पोस्ट त्याने शेअर केली आहे.

छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). कलाविश्वात सक्रीय असलेला कुशल सोशल मीडियावरही सक्रीय असून तो वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. कुशलच्या प्रत्येक पोस्टला नेटकरी भरभरुन प्रतिसाद देत असतात. यात अलिकडेच जीवनाचं सार सांगणारी एक पोस्ट त्याने शेअर केली आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दु:ख असतात. मात्र, बऱ्याचदा जास्त विचार करण्यामुळे त्याचा त्रास आपल्यालाच होतो. त्यामुळे परिस्थिती बदलत नसेल तर आपण स्वत:ला बदला असं सांगणारी त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे.

"रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला, मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू…हळू ... रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर, आणि त्या उशीवरून ह्या उशीवर .“वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही.अश्या वेळी मग आपण स्वतःला बदलायचं.- सुकून", अशी पोस्ट कुशलने शेअर केली आहे.

दरम्यान, कुशल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर आहे. चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून तो दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. तसंच त्याने काही गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्यासेलिब्रिटी