Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, केळवणाचे फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:25 IST

'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्याची लगीनघाई, लवकरच बांधणार लग्नगाठ

सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. प्रथमेश परब, शिवानी सुर्वे, पूजा सावंत, योगिता चव्हाण-सौरभ चौघुले यांच्या नंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची लगीनघाई सुरू झाली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता कौस्तुभ दिवान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला कौस्तुभ लवकरच त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच जानेवारी महिन्यात त्याचा साखरपुडा पार पडला. आता त्याच्या घरी लगीनघाई सुरू आहे. मराठी कलाकारांनी नुकतंच कौस्तुभचं केळवण केलं. याचे फोटो समोर आले आहेत. आस्ताद काळे, मेघा धाडे, स्वप्नाली पाटील, शाल्मली, शिल्पा नवलकर या कलाकारांनी कौस्तुभ आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या केळवणाचा घाट घातला होता. कौस्तुभच्या होणाऱ्या पत्नीचं नाव किर्ती कदम असं आहे. 

कौस्तुभने ‘बंध रेशमाचे’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे!’, ‘तुजं माजं सपान’ अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. तर 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'जेता', 'सिटिझन' या सिनेमांमध्येही तो झळकला आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रेटी वेडिंगटिव्ही कलाकार