Join us
Daily Top 2Weekly Top 5

उलगडणार संत ज्ञानेश्वरांची ज्ञानगाथा; चिन्मय मांडलेकरांची 'ज्ञानेश्वर माउली' प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 18:45 IST

Dnyaneshwar mauli: या मालिकेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची जीवनगाथा उलगडली जाणार आहे. 

ठळक मुद्देही मालिका सुरु होण्यापूर्वी चिन्मय मांडलेकरने आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

मराठी कलाविश्वात आतापर्यंत अनेक संत, महात्मा, थोर पुरुष यांच्यावर आधारित चित्रपट, मालिका यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्येच आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित ज्ञानेश्वर माउली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची जीवनगाथा उलगडली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मालिका कमी कालावधीत लोकप्रिय होत असून या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरत आहेत. 

काही दिवसांपूर्वीच सोनी मराठीवर ज्ञानेश्वर माउली ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेची निर्मिती चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी केली आहे. तसंच दिग्पाल यांनी या मालिकेचं दिग्दर्शनदेखील केलं आहे.

भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. 

करण सिंह ग्रोवरची पहिली पत्नी दिसते बिपाशाइतकीच सुंदर;  घटस्फोटानंतर लूकमध्ये झालाय कमालीचा बदल

दरम्यान, ही मालिका सुरु होण्यापूर्वी चिन्मय मांडलेकरने आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा  उलगडणार आहे 

टॅग्स :टेलिव्हिजनचिन्मय मांडलेकरसेलिब्रिटी