करण सिंह ग्रोवरची पहिली पत्नी दिसते बिपाशाइतकीच सुंदर; घटस्फोटानंतर लूकमध्ये झालाय कमालीचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:20 PM2021-10-01T12:20:57+5:302021-10-01T12:28:07+5:30

Shraddha nigam : श्रद्धासोबत घटस्फोट झाल्यानंतर करणने २०१२ मध्ये जेनिफर विंगेटसोबत लग्न केलं.

'दिल मिल गये' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे करण सिंग ग्रोवर.

छोटा पडदा गाजवल्यानंतर करण सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. उत्तम अभिनय आणि पर्सनालिटीमुळे करण कायमच सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. यामध्येच सध्या त्याच्या पहिल्या पत्नीची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न करणाऱ्या करणचे यापूर्वी दोन वेळा घटस्फोट झालेला आहे. यामध्येच त्याच्या पहिल्या पत्नीचा म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा निगमचा (Shraddha Nigam) आज वाढदिवस आहे.

करण सिंग ग्रोवरने २००८ मध्ये श्रद्धा निगमसोबत लग्न गाठ बांधली होती. मात्र, केवळ वर्षभरामध्येच या दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला.

श्रद्धा निगम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'चुडियाँ' या मालिकेच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

श्रद्धा मुळची मध्य प्रदेशमधील इंदूर येथील असून तिने पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला.

श्रद्धाने 'चुडियाँ' मालिकेनंतर 'मानो या ना मनो', 'कहानी घर घर की' आणि 'कृष्ण अर्जुन' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं.

करणचे इतर स्त्रियांसोबत संबंध असल्यामुळे श्रद्धाने घटस्फोट घेतल्याचं म्हटलं जातं.

श्रद्धाने डिसेंबर 2012 मध्ये अभिनेता मयंक आनंदसोबत लग्न केलं.

श्रद्धाने डिसेंबर 2012 मध्ये अभिनेता मयंक आनंदसोबत लग्न केलं.

श्रद्धा आणि मयंक दोघेही आता फॅशन डिझायनिंगचे काम करतात. सध्या श्रद्धा टीव्हीच्या जगापासून दूर आहे.

श्रद्धासोबत घटस्फोट झाल्यानंतर करणने २०१२ मध्ये जेनिफर विंगेटसोबत लग्न केलं. परंतु, 2016 मध्ये जेनिफरने करणला घटस्फोट दिला.

एप्रिल 2016 मध्ये करणने अभिनेत्री बिपाशा बसूसोबत तिसरे लग्न केले.