Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मुलगी ७ महिन्यांची असताना तिला फिट यायची अन् तेव्हा...", सागर कारंडेने सांगितला 'तो' वाईट प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:15 IST

"मुलीला फिट्स यायच्या,तिच्या तोंडातून फेस...",सागर कारंडे 'त्या' कठीण काळाबद्दल बोलताना झाला भावुक, थोडं जरी दुर्लक्ष झालं असतं तर...

Sagar Karande : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय विनोदी अभिनेता म्हणजे सागर कारंडे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून तो घराघरात पोहोचला. गेली अनेक वर्ष अभिनेत्याने अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.सध्या हा अभिनेता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, या प्रवासात सागर कारंडेला अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्या कठीण काळावर भाष्य केलं आहे.

अभिनेता सागर कारंडेने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे.शिवाय काही काळ त्याने एका बड्या कंपनीत काम देखील केलं. परंतु, अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्या कठीण काळात कुटुंबांची,पत्नीची कशी साथ मिळाली, याविषयी सांगितलं. या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, माझं अरेंज मॅरेज झालंय. आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला आणि पहिल्या भेटीतच आम्ही एकमेकांना पसंत केलं. पण,त्यावेळी मला आणि माझ्या घरच्यांना फक्त एका गोष्टीचं टेन्शन होतं की समोरच्या मंडळींना मुलाबद्दल काय सांगायचं. मुलगा कलाकार आहे पण पोटापाण्यासाठी काय करतो.

त्यानंतर अभिनेता म्हणाला, "एक दिवस मला तिचा फोन आला, भेटूया म्हणून. मी तिला माझ्या नाटकाची रिहर्सल होती, तिथे ती आला. थोडा वेळ तिने बघितलं, काय चाललंय. मला तिने विचारलं, 'हे काय आहे?' हा प्रश्न ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. आता आयुष्यभर हिला काय सांगायचं, मी काय करतोय. याआधी तिने कधीच मराठी नाटक नव्हतं बघितलं. भेटल्यानंतर ती म्हणाली, तुम्हाला हवं ते करा, करा. पण ते काम जीव लावून पूर्ण करा. तिला या क्षेत्राबद्दल पहिल्यांदा काहीच माहित नव्हतं."

मुलीला फिट्स यायच्या तोंडातून फेस यायचा, अन्...

"पण तिने चांगल्या पद्धतीने घर सांभाळलं, मला सांभाळलं. मला मुलगी झाली, त्यानंतर एक ६-७ महिन्यात तिला ताप यायचा, फिट्स यायच्या, तोंडातून फेस यायचा. डॉक्टरांनी सांगितलेलं, तिचा ताप वाढू देऊ नका, काही झालं तरी. त्यावेळी डॉक्टरांना सोनोग्राफी करायला सांगितलेली. पण, सोनोग्राफीसाठी माझ्याकडे १००० रुपये नव्हते. त्यादिवशी मला स्वतःचा खूप राग आलेला. म्हटलं, नालायक आहेस तू, बाप होण्याची लायकी नाहीये. त्यादिवशी शपथ घेतली, माझ्या बायकोला, मुलीला आणि घरच्यांना कसली कमी पडू देणार नाही. शेवटी बायकोने सांभाळलं." असा भावुक करणारा प्रसंग अभिनेत्याने शेअर केला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sagar Karande recalls daughter's illness and financial struggles as a father.

Web Summary : Actor Sagar Karande shared his emotional journey, recalling his daughter's illness and his financial struggles. He remembers feeling helpless when he couldn't afford her sonography, vowing to provide for his family.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीबिग बॉस मराठी ६